|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाई शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम

वाई शहरामध्ये विशेष स्वच्छता मोहीम 

प्रतिनिधी/ वाई

महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे धोम धरणातून पाण्याचा विसर्ग कृष्णानदीत सोडल्याने वाई शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. नदीपात्रामधील पुराचे पाणी ओसरल्यानंतर प्रवाहातील पाण्याबरोबर घाण व कचरा मोठया प्रमाणात वाहून आलेला होता. त्यामुळे नगरपरिषदेच्या आरोग्य विभगामार्फत शहराच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेत शहरातील स्वच्छता व साफसफाई करण्यासाठी एकूण 10 पथके तयार करुन प्रत्येकी पथकात 16 कर्मचारी असे एकूण 160 कर्मचाऱयांमार्फत व 10 घंटागाडय़ा, 4 ट्रक्टर अशी वेगवेगळी 10 पथके तयार करण्यात आली होती. या पथकामार्फत शहरातील स्वच्छता करण्यात आली.

या मोहिमेची सुरुवात श्री महागणपती मंदिरापासून करण्यात आली.. शहरातील नावेची वाडी, गंगापूरी, मधली आळी, गणपती आळी, भाजीमंडई, किसनवीर चौक, साठेधर्म शाळा परिसर, धुंडीविनायक परिसर, ब्राम्हणशाही परिसर, रामडोह आळी परिसर, यंगर विवारचौक परिसर, चावडीचौक, कल्पतरु मंगल कार्यालय परिसर, पेठकर कॉलनी, भुई गल्ली, रांगोळी आळी परिसर, चर्मकार वसाहत परिसर, शिंदे हायस्कूल परिसर, वाई परटाचा पार परिसर, घोरपडे हॉस्पीटल परिसर, कळवत आळी परिसर, रविवारपेठ स्मशानभूमी परिसर, फुलेनगर परिसर, जुम्मा मशिद परिसर, सुर्यवंशी चौक परिसर, अंबाबाई मंदीर परिसर, हनुमान मंदीर परिसर सिध्दनाथवाडी, दत्तनगर, एस.टी.स्टॅड परिसर, सायली कट्टा, गितांजली हॉस्पीटल परिसर, शाळा क्र. 1 नंबर परिसर, ज्योतीबा मंदीर परिसर, वाई पोलीस स्टेशन, कचेरी, परशुराम मंदीर आदी परिसराची स्वच्छता करण्यात आली.

स्वच्छतेसाठी 10 पथके तैनात

या मोहिमेत शहरातील सामजिक संस्था व नागरिकांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. वाई शहराचा 40 टक्के भाग हा नदीकाठावर असल्याने पाऊस ओसरल्यानंतर या भागामध्ये मोठया प्रमाणात अस्वच्छता दिसून येत होती. यासाठी मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी समक्ष पाहणी करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकामध्ये एकूण 16 कर्मचारी प्रमाणे 1 अधिकारी 5 सहाय्यक कर्मचारी, 1 मुकादम, 8 सफाई कर्मचारी, व 1 वाहनचालक यांच्यामार्फत शहरातील स्वच्छतेचे काम स्वतंत्र पथकनिहाय चालू होते.

या मोहिमेमध्ये शहरातील 10 प्रभागांमधील सर्व सदस्य व त्यांचे कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत, सुनिता चक्के, महेंद्र धनवे, सतिश वैराट, सुमय्या इनामदार, सीमा नायकवडी, संग्राम पवार, स्मिता हगीर, भारत खामकर, किशोर बागुल, वासंती ढेकाणे, रुपाली वनारसे, चरण गायकवाड, शितल शिंदे, प्रदीप चोरगे, विकास काटेकर, रेश्मा जायगुडे, राजेश गुरव, प्रियांका डोंगरे, आरती कांबळे, दीपक ओसवाल, ऍड. श्रीकांत चव्हाण या मोहिमेत सहभागी झाले होते. यामध्ये कृष्णा नदी सेवा कार्याचे काशिनाथ शेलार, प्रा. नितीन कदम, अमित सोहनी, चंद्रशेखर वनारसे, कुमार पवार, विवेक चिंचकर, सुधीर क्षीरसागर, काका डाळवाले, भवरलाल ओसवाल, पत्रकार भद्रेश भाटे, सुशिल कांबळे, विजय ढेकाणे, किरण खामकर यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. शिक्षण प्रशासन अधिकारी वाळवेकर साहेब, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी झाले होते.

Related posts: