|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रेम प्रकरणामुळे मैथिलीचा खून?

प्रेम प्रकरणामुळे मैथिलीचा खून? 

खेडशीतील जंगलात सापडला होता मृतदेह

प्रतिनिधी/ रत्नागिरी

शहरानजीक असलेल्या खेडशी येथील मैथिली गवाणकर हिच्या खूनाच्या तपासात संशयाची सुई प्रेमप्रकरणाच्या दिशेने वळली आह़े  मैथिली गवाणकर हिचे तिच्याच गावात राहणाऱया तरूणासोबत प्रेमसंबध असल्याचे समोर आले आह़े त्यानुसार पोलिसांकडून या तरूणाची चौकशी करण्यात येत आह़े  तसेच सर्व शक्यता ग्रामीण पोलिसांकडून तपासण्यात येत आहेत़

शुक्रवारी सायंकाळी मैथिली गवाणकर (ऱा खेडशी-गवाणकरवाडी) या 16 वर्षीय मुलीचा खेडशीतील जंगलात दगडाने ठेचून खून करण्यात आला होत़ा मैथिली ही महाविद्यालयातून परत आली असता ती शेळ्य़ा चरवण्यासाठी घराशेजारी असलेल्या रानात गेली होत़ी दरम्यान सायंकाळी शेळ्य़ा घरी परतल्या, मात्र मैथिली घरी न परतल्याने ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिचा मृतदेह घराजवळच्या रानात आढळून आला होत़ा

या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  पोलिसांकडून मैथिली हिचा मोबाईल ताब्यात घेतला असून कॉल डिटेल्स तपासले जात आहेत़ तसेच मैथिली हिचे प्रेमप्रकरण असल्याचे देखील तपासात समोर आले असून त्या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: