|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्रस्तावित रिफायनरी क्षमतेत मोठी कपात

प्रस्तावित रिफायनरी क्षमतेत मोठी कपात 

इलेक्ट्रिक वाहनांमुळे मागणी घटणार

प्रतिनिधी/ रत्नागिरी

इंधनाची मागणी कमी होण्याची शक्यता राष्ट्रीय स्तरावरून व्यक्त होत असल्यामुळे देशातील सर्वात मोठय़ा प्रस्तावित खनिज तेल शुद्धीकरण कारखान्याच्या (रिफायनरी) क्षमतेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े  पर्यावरणाच्या कठोर नियमांची पूर्तता व स्थलांतराच्या शक्यतेमुळे प्रकल्प खर्च 60 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आह़े

एका उच्चस्तरीय अधिकाऱयाने पत्रकारांशी बोलताना सांगितले, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या सरकारी कंपन्यांसोबत सौदीची अरामको आणि अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनी यांनी प्रकल्प साकार करायचे ठरवले आह़े  60 दशलक्ष टन वार्षिक क्षमतेची †िरफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स उभारण्याचे ठरवण्यात आले होत़े महाराष्ट्र किनाऱयावर हा कारखाना होणार, हे नक्की करण्यात आल़े

रिफायनरीत 3.08 लाख कोटी रूपये खर्च अपेक्षित आह़े परंतु पेट्रोलियम कोक तयार न करणे आणि वनस्पतींची पुर्नलागवड यासारख्या हवामानविषयक कठोर निकषांची पूर्तता अत्यावश्यक झाली आह़े सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्याने हे करावे लागणार आह़े  या आदेशामुळे पेट्रोलियम कोक विकण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत़ त्यामुळे प्रकल्प किंमत वाढल्याचे अधिकाऱयाने म्हटले आह़े

प्रकल्प रायगडला स्थलांतरीत झाल्यास अधिक खर्च येईल़                                                         रत्नागिरीत तो कमी खर्चात झाला असत़ा भूसंपादन खर्चात मोठी वाढ आह़े पेट्रोल-डिझेलवरील वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे राष्ट्रीय धोरण लक्षात घेता दोन्ही प्रकारच्या इंधन मागणीत कपात होईल, अशी शक्यता आह़े  त्यामुळे प्रकल्पाची क्षमता 60 दशलक्ष मेट्रीक टनऐवजी 44 दशलक्ष मॅट्रीक टन एवढय़ा क्षमतेची रिफायनरी उभारण्याचे ठरवण्यात आल्याचेही अधिकाऱयांनी सांगितल़े

सुरूवातीला 40 दशलक्ष मेट्रीक टन क्षमतेची रिफायनरी उभारून नंतरच्या टप्प्यात गरज लक्षात घेऊन आणखी 20 दशलक्ष मेट्रीक टन क्षमतेची रिफायनरी उभारावी, असाही प्रस्ताव आह़े याला मंत्रीमंडळाची मंजुरी आवश्यक आह़े 2021 पूर्वी उभारणीची सुरूवात 2021 पासून होईल आणि त्यानंतर उभारणीला 4-5 वर्ष लागतील़  मुंबईतील रिफायनरीची क्षमता वाढू शकत नसल्यामुळे देशातील पश्चिम विभागातील ऊर्जेची गरज ही रिफायनरी भागवेल़

 

 

Related posts: