|Friday, November 15, 2019
You are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » डॉ. विक्रम साराभाईंच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल

डॉ. विक्रम साराभाईंच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डुडल 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

‘इस्रो’चे संस्थापक आणि भारतीय अंतराळ संशोधन मोहिमेचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

डॉ. विक्रम साराभाई हे भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह मानले जात. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ऑपरेशन रिसर्च ग्रुप, विक्रम साराभाई स्पेस सेंटर अशा देशांतील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत साराभाई यांचा मोलाचा वाटा होता. उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना 1962 साली शांती स्वरूप भटनागर पदक देऊन गौरविण्यात आले होते.

साराभाई यांचा जन्म अहमदाबाद येथे 12 ऑगस्ट 1919 रोजी झाला. विक्रम यांचे प्रारंभीचे शिक्षण त्यांच्या आईने सुरू केलेल्या शाळेत झाले. 12 वी नंतर इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातील सेंट जोन्स कॉलेजातून ते 1939 साली रसायन आणि भौतिक या विषयातील परीक्षा उतीर्ण झाले. बंगळुरू येथील ‘इंडियन इंस्टिटय़ूट ऑफ सायन्स’ मध्ये त्यांनी कोस्मिक किरणांवर संशोधन करण्यास सुरुवात केली.

Related posts: