|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » Top News » मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळले; रिक्षाचालक ठार

मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळले; रिक्षाचालक ठार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुलुंडमध्ये रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. मुलुंड पश्चिमेकडील एन एस रस्त्यावर रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

अशोक शिंगरे (वय 45) असे मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर प्रवासी राजेश भंडारी (29) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक अशोक शिंगरे यांना पालिकेच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमी राजेश भंडारी यांच्यावर वीर सावरकर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. झाडाची छाटणी झाली नसल्याने ही दुर्घटना झाली असल्याचा आरोप केला आहे.

Related posts: