|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Automobiles » सुझुकीची ‘जिक्सर 250’ लाँच

सुझुकीची ‘जिक्सर 250’ लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सुझुकी’ने भारतीय बाजारात ‘जिक्सर 250’ ही बाईक लाँच केली आहे. बाजारातील यामहा ‘एफझेड 25’, ‘केटीएम 250 ड्युक’ आणि बजाज ‘डोमिनार 400’ सारख्या बाईकशी जिक्सरची स्पर्धा असणार आहे.

‘जिक्सर एसएफ 250’ या बाईकचे हे पुढील व्हर्जिन आहे. या बाईकमध्ये 249 सीसी, सिंगल-सिलिंडर, एओएचसी ऑइल-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 9,000 आरपीएमवर 26.5 एचपी पॉवर आणि 7,500 आरपीएमवर 22.6 एनएम टॉर्क उत्पन्न करते. इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सपेक्षा कमी आहे.

‘जिक्सर 250’ या बाईकचा लुक हा कंपनीने अलीकडे प्रदर्शित केलेल्या ‘जिक्सर 155’ या बाईकसारखा आहे. या बाईकमध्ये ‘जिक्सर 155’ सारखे एलईडी हॅडलॅम्प डिझाइन, स्पिल्ट सीट असे फिचर्स आहेत. या नव्या बाईकमध्ये स्पोर्टी डय़ुअल मफलर, ब्रश्ड फिनिश अलॉय वील्ज आणि नवे डिजिटल इन्स्ट्रिमेंट क्लस्टर मिळणार आहे. ही बाइक मॅटेलिक मॅट ब्लॅक, मॅटेलिक मॅट प्लेटिनम चंदेरी, मॅटेलिक मॅट ब्लॅक रंगातही उपलब्ध आहे. या बाइकची एक्स शोरुम किंमत 1.60 लाख रुपये आहे.

Related posts: