|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना 1 ट्रक मदत

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना 1 ट्रक मदत 

पुणे / प्रतिनिधी : 

सांगली, कोल्हापूरसह आजूबाजूच्या परिसरात आलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीमुळे अनेकांचे संसार पुरात वाहून गेले आहेत. त्यांचे संसार पुन्हा सावरण्यासाठी मंदिराच्या दानपेटीत जमा झालेल्या आणि देणगी स्वरुपात मिळालेल्या निधीतून दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टने जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला एक ट्रक पूरग्रस्तांना मदत म्हणून पाठविला.

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणारी मदत मंदिरात जमा करण्यात आली. ट्रस्टच्यावतीने कपडे, स्वेटर, ब्लँकेट्स, चटई, चादरी, टॉवेल्स, सॅनिटरी नॅपकिन, लहान बाळांचे डायपर, किराणा साहित्य, कोलगेट, साबण, बिस्किट, सुके खाद्य पदार्थ, पाण्याच्या बाटल्या, स्वच्छतेसाठी फिनेल अशा विविध जीवनावश्यक वस्तूंची 1 ट्रक भरून मदत देण्यात आली.

यावेळी विशेष शाखा पोलीस उपायुक्त मितेश घट्टे, परिमंडळ १®³ाा पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Related posts: