|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुण्यातून राष्ट्रवादीचे वैद्यकीय पथक रवाना

पुण्यातून राष्ट्रवादीचे वैद्यकीय पथक रवाना 

पुणे / प्रतिनिधी  :

सांगली आणि कोल्हापूर येथील महापूर ओसरण्यास सुरुवात झाल्यावर मदतीसाठी अनेक हात पुढे येऊ लागले आहेत. या भागातील नागरिकांना साथीच्या आजारापासून वाचविण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैद्यकीय पथक पुण्यातून सोमवारी रवाना झाले. या पथकाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी हिरवा झेंडा दाखवला.

 मागील आठवडय़ापासून सांगली, कोल्हापूर परिसरामध्ये पावसामुळे भयानक परिस्थिती उद्भवली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे रेस्क्मयू ऑपरेशन सुरू आहे. आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पाणी ओसरल्यावर विविध आजार पसरण्यास सुरुवात होवू शकते. अशावेळी गावागावात मोठय़ा प्रमाणावर वैद्यकीय मदत लागणार आहे. यासाठी राष्ट्रवादीतर्फे सुमारे 300 डॉक्टर सेवेत सामील झाले आहेत. डॉक्टरांसह औषधे आणि इतर वैद्यकीय सामुग्रीही पाठवण्यात आली.

या वेळी डॉक्टर सेलचे डॉ. नरेंद्र काळे, पुणे शहराध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांच्यासह खासदार वंदना चव्हाण, प्रदीप गारटकर, संजोग वाघेरे, पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, अंकुश काकडे, दिलीप बराटे तसेच अनेक डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते. पथकात पुढे मिरज आणि जवळील भागातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत.

 

Related posts: