|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » हवामान विभाग : कोल्हापूर, पुण्यात 14 ऑगस्टपर्यंत मुसळधार

हवामान विभाग : कोल्हापूर, पुण्यात 14 ऑगस्टपर्यंत मुसळधार 

पुणे / प्रतिनिधी : 

दक्षिण मध्यमहाराष्ट्रातील घाटमथ्यावर बरसणारा पाऊसाने दोन दिवस व़िश्रांती घेतली होती. आता मात्र पुन्हा एकदा सलग तीन दिवस म्हणजेच 14 ऑगस्ट पर्यंत कोल्हापूर, सातारा आणि पुणे भागातील घाटमथ्यावरील तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

याबरोबरच उत्तर मध्यमहाराष्ट्रातील नाशिक भागातील घाटमाथा, कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मुसळधर पाऊस हजेरी लावणार आहे, विदर्भ आणि विदर्भातील एक ते दोन ठिकाणी तुरळक प्रमाणात मुसळधार पाऊस हजेरी लावले. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे .उर्वरित भागात मात्र केवळ हलक्मया ते मध्यम स्वरूपाचा पावसाच्या सरी पडतील.