|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » खासदार रामदास आठवलेंची पुरग्रस्तांना मदत

खासदार रामदास आठवलेंची पुरग्रस्तांना मदत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूरमध्ये महापुराने थैमान घातले आहे. या पुराच्या पाण्यामुळे लाखो लोकांचे संसार बुडाले आहेत. या लोकांना अन्न धन्यापासून कपडेलत्याची गरज भासणार आहे. यामुळे राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. कोणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देतोय तर कोणी वेगवेगळय़ा संस्थांना. राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनीही कोल्हापूर आणि सांगली जिह्याला खासदार निधीतून विभागून मदत देऊ केली आहे. आज त्यांनी हैद्राबादमार्गे कोल्हापूरात येत पूरस्थितीची पाहणी केली.

कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागांत आठवले यांनी पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पुरग्रस्तांच्या भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची, मदतीची गरज आहे. या पूरग्रस्तांच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पूरग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचे; त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी केले.

 

Related posts: