|Monday, December 9, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नारायण धारप आणि तात्या विंचू

नारायण धारप आणि तात्या विंचू 

भयकथा रचणारे लेखक म्हणून नारायण धारप ख्यातनाम आहेत. धारपांच्या लोकप्रियतेला तोड नाही. त्यांनी विज्ञानकथा, सामाजिक कथा-कादंबऱया देखील लिहिल्या. पण त्यांची ख्याती भयकथांसाठी. सगळी नास्तिक माणसे त्यांचे साहित्य वाचतात. का ते ठाऊक नाही. भय हा देखील नवरसातील एक रस आहे. भयकथा वाचण्याचा, भीतीचा थरार अनुभवण्याचा आनंद वेगळा, हवाहवासा वाटणारा असतो. काही वेळा भयकथा दिवसा वाचताना मचूळ वाटतात आणि रात्री घरात कोणी नसताना त्याच कथांमधला एखादा प्रसंग आठवला की झोप उडते!

अशाच एका भयकथेचा मजेदार अनुभव… एका स्नेही कुटुंबात नवरा, बायको, छोटी मुलगी राहतात. पालकांनी मुलीला एक मजेदार खेळणे आणलेले-हे खेळणे म्हणजे बाहुलीच्या आकाराचा बोका आहे. त्याच्या पोटात ध्वनिमुद्रण यंत्रणा आणि विद्युत सेल्स आहेत. या यंत्रणेमुळे बोक्मयासमोर आपण जे बोलू त्याची तो नक्कल करतो. लहान मुलांना याची गंमत वाटते. मुलं बोक्मयासमोर बडबड करतात. बोका तेच पुन्हा बोलतो. मित्राच्या घरातला हा बोका थोडा खराब झाला होता. काही वेळा तो बोलू शकत नसे.

त्या दिवशी मित्राने धारपांची एक कादंबरी वाचली होती. नंतर झोप येत नाही म्हणून टीव्ही लावला, तर त्यावर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक भयपट चालू होता. या सिनेमात एक बोलका बाहुला मृतात्म्याने पछाडलेला असतो आणि स्वतःला ‘तात्या विंचू’ म्हणवून घेत असतो. पती-पत्नी सिनेमा बघत असताना मुलगी बोक्मयाशी खेळण्याचा प्रयत्न करीत होती. पण सेल किंवा आतील यंत्रणा बिघडल्यामुळे बोका प्रतिसाद देत नव्हता. कंटाळून मुलीने बोका कोपऱयात टाकून दिला आणि झोपी गेली. नंतर सिनेमा संपला आणि तिचे आई-वडील देखील झोपी गेले.  

रात्री बाराच्या सुमारास त्यांना एका विचित्र आवाजाने जाग आली. आवाज कोठून येत होता, समजत नव्हते. गुरगुरल्यासारखा आवाज आणि मग अचानक एक बालगीत विचित्र स्वरात. दोघे दचकून उठले. कमालीचे भ्याले. पलंगासमोरच्या कोपऱयातून बोका जोरजोरात गायला लागला होता. थोडय़ा वेळापूर्वी सिनेमात पाहिलेला तात्या विंचू आठवला. त्यांनी दिवे लावले. भीत भीत झडप घालून बोक्मयाला पकडले त्याच्या पोटातले विद्युत सेल्स काढून फेकले. त्यासरशी बोका गप्प बसला.

बोक्मयाला पलीकडच्या खोलीत टाकून दिले तरी त्यांना बराच वेळ झोप लागली नाही!

Related posts: