|Saturday, December 14, 2019
You are here: Home » उद्योग » होंडा-शेलकडून नवीन इंजिन ऑईलची श्रेणी

होंडा-शेलकडून नवीन इंजिन ऑईलची श्रेणी 

पुणे

 होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. आणि शेल ल्युब्रिकंट्स, फिनिश्ड उत्पादनांच्या जागतिक बाजारपेठेतील आघाडीच्या कंपनीने इंजिन ऑईलची नवी श्रेणी सादर करण्यासाठी धोरणात्मक भागीदारी केली आहे. होंडा टु-व्हीलर्स आणि शेल ल्युब्रिकंट्स यांची ही भागीदारी भारतीय बाजारपेठेतील दुचाकी तेल विभागातील पहिली भागीदारी आहे. यासंदर्भात होंडाच्या ग्राहक सेवा विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीपकुमार पांडे आणि शेलच्या देशप्रमुख मानसी त्रिपाठी यांनी माहिती दिली.

वाहनचालकांना दररोज रस्त्यांवर येणाऱया आव्हानांवर मात करण्यासाठी योग्य उत्पादन उपलब्ध करून देण्याच्या प्रवासाची सुरुवात या भागीदारीद्वारे केली आहे. नवी श्रेणी शेलचे तंत्रज्ञानविषयक ज्ञान आणि होंडाचे आधुनिक वाहन ब्लूपिंट यांच्या मिश्रणातून खास तयार केली आहे. या श्रेणीमध्ये सुधारित पिक अप आणि ऍक्सलरेशन, अधिक चांगली इंधन कार्यक्षमता, उच्च तापमानाला इंजिन संरक्षण, सफाईदारपणे गियर बदलणे, आव्हानात्मक परिस्थितीमध्ये सहजपणे गाडी चालवण्याची क्षमता असे नवे फायदे समाविष्ट करण्यात आले आहेत.

Related posts: