|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलतर्फे आरोग्य शिबिर 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

डॉ. डी वाय पाटील हॉस्पिटलच्यावतीने पूरग्रस्तांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रविवारी दिवसभरात गांधीनगर, वसगडे, वळीवडे, उचगाव, फुलेवाडी, मार्केटयार्ड, दुधाळी, रायगड कॉलनी याठिकाणी आरोग्य शिबीरे  झाली. यावेळी डीवायपी ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील, ऋतुराज पाटील, प्रतिमा सतेज पाटील यांनी भेटी देऊन नागरिकांची विचारपूस केली. शिबिराच्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.