|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » अतिवृष्टीमुळे ग्रेड सेपरेटरला ब्रेक

अतिवृष्टीमुळे ग्रेड सेपरेटरला ब्रेक 

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील जटील बनत चाललेला वाहतूकीचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने ग्रेड सेपरेटरचे महत्वकांक्षी काम सुरुवातीला वेगाने सुरु होते. त्या कामाचा वेग टप्याटप्याने मंदावू लागला असल्याचे साताकरांच्या दृष्टीस पडू लागले आहे. त्यामुळे हे काम लवकर कधी पूर्ण होईल याकडे नजरा लागल्या आहेत. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसात हे काम अतिशय धिम्यागतीने सुरु असून सध्या केवळ 10 टक्के काम होत आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत काम पूर्ण होईल काय?, असा सवाल उपस्थित होवू लागला आहे. बांधकाम विभागाकडून मात्र काम वेळेत पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे. कामास निधीची कमरता असून तो निधी कसा मिळेल हा यक्ष प्रश्न आहे.

सातारा शहरात दिवसेंदिवस नवनवीन वाहने रस्त्यावर येतात. अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यामुळे वाहतूकीचा प्रश्न जटील बनू पहात होता. पोवई नाका परिसरात बँका, शाळा, कॉलेज, रुग्णालये जवळच असल्याने वाहतूकीची कोंडी नित्याचीच बनू पहात होती. महाराजा सयाजीराव विद्यालयाजवळ अनेक अपघात घडून कित्येक जीवही गेले आहेत. तर सभापती निवासनजिकही अपघाताच्या घटना घडल्या होत्या. साताकरांकडून वारंवार महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या परिसरात उड्डाणपुल करण्याची मागणी होत होती. त्यानुसार सुरुवातीला उड्डाणपुलाची हालचाल होवू लागली. ग्रेड सेपरेटर करण्याचा विचार पुढे आला आणि त्यानुसार ग्रेड सेपरेटरचा आराखडाही तयार करुन शासनाकडून मंजूरी मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभर 14 फेब्रुवारीला अडीच वर्षापूर्वी झाला होता. हे काम काळय़ा कातळात करायचे असल्याने मशिनरीच्या सह्याय्याने सुरुवातीला काम घेतलेल्या टीऍण्डटी कंपनीने वेगाने सुरुवात केली. परंतु त्या कामावर तक्रारी झाल्याने हे काम धिम्या गतीने होवू लागले.

आज हे काम काही बऱयापैकी पुर्णत्वाकडे येवू लागले आहे. परंतु सध्या स्थिती गेल्या एक महिन्यामध्ये या कामांमध्ये बराच बदल होताना दिसू लागले आहे. कामगारांची संख्या आपोआप कमी कमी होताना व कामाचा वेग मंदावताना दिसत आहे. या कामांमध्ये अजूनही निधीची गरज असल्याचेही समोर येते. अजूनही 15 कोटी रुपयांची गरज आहे. निधीच्या कारणास्तव हे काम रेंगाळले गेल्याचे समजते. त्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे तर हे काम आणखी ठप्प झाले आहे. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार याकडे साताकरांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

बांधकाम विभागाचा सप्टेंबरला महाराजा सयाजीराव विद्यालयासमोरील रस्ता खुला करण्याचा दावा

बांधकाम विभागाचे अभियंता आंबेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ग्रेड सेपरेटरचे काम पावसामुळे मंदावले आहे. पावसाची उघडीप झाल्यानंतर पुन्हा काम वेगाने सुरु होईल. 6 तारखेलाच महाराजा सयाजीराव विद्यालयासमोरील स्लॅबचे काम करण्यात आले आहे. त्या स्लॅबला 21 दिवस लागतात. सप्टेंबरमध्ये हा रस्ता सुरु करण्यात येणार आहे. सध्या कोल्हापूरकडे जाणाऱया आणि कोरेगावकडे जाणाऱया रुटचे काम सुरु आहे. तेही काम दिलेल्या मुदतीत करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Related posts: