|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राखीच्या स्टॉलवर खरेदीला गर्दी

राखीच्या स्टॉलवर खरेदीला गर्दी 

प्रतिनिधी/ सातारा

मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा पर्ववत होत आहे. पूर ओसत असून पावसाने उघडीप दिल्याने बाजारपेठेत खरेदीला वेग आला आहे. रक्षाबंधन सणाला पाच दिवस शिल्लक असल्याने राखीच्या स्टॉलवर गर्दी होवू लागली आहे.

       15 ऑगस्टला रक्षाबंधन हा सण असल्याने राखी विपेत्यांनी महिन्यांच्या सुरूवातीलाचा शहरात ठिकठिकाणी स्टॉल लावले होते. रंगेबेरंगी राखी ग्राहकांना चांगल्याच आकर्षित करत होत्या. मात्र पावसाचा जोर अचानक वाढल्याने जनजीवन विस्कळीत झाले. वाहतूक ठप्प होवून खरेदीवर बेक लागला. आणि बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. राखी खरेदीकडे ग्राहकांनी पाठच फिरवल्याने विक्रेत्यापुढे प्रश्न चिन्ह उभे राहिले होते. दरम्यान दोन दिवसापासून पावसाची उघडीप सूरू असल्याने पूर स्थिती नियंत्रणात येत आहे. तसेच जनजीवन पुन्हा सूरळीत होवू लागल्याने खरेदीला वेग आला आहे. भाजी, गृहउपयोगी वस्तू, तसेच सणानिमित्त वस्तू खरेदीसाठी दुकाने गजबजली आहेत. रक्षाबंधन सणासाठी पाच दिवस शिल्लक रहिल्याने महिला-तरूणी राखी खरेदीसाठी स्टॉलवर गर्दी करत आहेत. 

पोस्टात गर्दी…

रक्षाबंधन सणाला आपल्या भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी म्हणून महिला-तरूणींनी खरेदीला गर्दी केली आहे. तसेच पुणे, मुंबई व ग्रामीण भागात असणाऱया भावाला राखी पोस्टाने पाठवली जाते. ही राखी दोन दिवस आधी पोहचावी म्हणून पोस्टात गर्दी होवू लागली आहे.

Related posts: