|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जिह्यात काँग्रेसचे अस्तित्व नगण्यच!

जिह्यात काँग्रेसचे अस्तित्व नगण्यच! 

वार्ताहर/ खटाव

सातारा जिह्यात काँग्रेसची मोठी ताकद होती. मात्र, पक्षनेतृत्वाने सक्षम कार्यकर्त्यांचे नेहमीच खच्चीकरण केले. याबाबतीत आमदार जयकुमार गोरे यांचे उदाहरण बोलके आहे. त्यांच्या संघटन कौशल्याला काँग्रेसने वाव दिला नाही. आज आमदार गोरे आणि जिह्यातील त्यांचे सहकारी वगळले तर काँग्रेसचे अस्तित्व नगण्यच राहील, असे मत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. 

   बोराटवाडीत चार दिवसांपूर्वी जिह्यातील काँग्रेस पदाधिकाऱयांच्या पार पडलेल्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. खासदार रणजितसिंह पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाला मोठी परंपरा आहे. जिह्यात काँग्रेसची चांगली ताकदही होती. मात्र, सध्याच्या पक्षनेतृत्वाने सक्षम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांना कधी ताकदच दिली नाही. कायम त्यांचे खच्चीकरण केले. कार्यकर्ता आणि पदाधिकारी मोठा होवूच दिला नाही. माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे जिह्यात सर्वाधिक पोटॅन्शियल असणारे नेतृत्व आहे. मात्र, त्यांचेही कायम खच्चीकरण करण्यात आले. त्यांना काँग्रेसमध्ये नेहमीच डावलण्यात आले. जिह्यात काँग्रेसच्या वाढीसाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले. काँग्रेसचे नेतृत्व मोठे करण्यासाठी त्यांनी कोणतीच पर्वा न करता विरोधी राष्ट्रवादीला अंगावर घेतले. त्या संघर्षात त्यांना खूप काही भोगावे लागले. कोरेगाव, कराड उत्तर मतदारसंघात काँग्रेसची ताकद असूनही पक्षनेतृत्वाने लक्ष दिले नाही. आमदार गोरेंनीच या भागातील कार्यकर्त्यांना ताकद दिली. आता तर ‘पोपट मेलाय’ असे काँग्रेस कार्यकर्ते जाहीरपणे सांगायला लागले आहेत. 

  आमदार गोरेंनी मतदासंघाच्या विकासाशिवाय कोणतीच अपेक्षा केली नाही. माण आणि खटाव या कायम दुष्काळी भागातील पाणीयोजनांच्या पूर्ततेसाठी त्यांनी सर्वाधिक प्रयत्न केले. स्वतःबरोबरच जिह्यातील सहकाऱयांनाही राजकारणात ताकद देण्यात ते कमी पडले नाहीत. मैत्री कशी करावी, मैत्रीत त्याग कसा करावा हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. विधानपरिषद निवडणूक आणि माझ्या लोकसभा निवडणुकीत नेतृत्व आणि नियोजन कसे असावे याचा परिपाठच त्यांनी घालून दिला. त्यांचाकडे जिह्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. आज त्यांच्या पाठिशी जिह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठय़ा विश्वासाने उभे राहिले आहेत. आमदार गोरे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी बांधिल राहण्याचे सर्वांनी ठरवले असून आमदार गोरे हे सर्वांच्या हिताचा आणि जिह्याच्या विकासाचा निर्णय लवकरच घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.।़  

आता माझी वेळ आली आहे

आमदार जयकुमार गोरे यांचे माझ्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत मोठे योगदान आहे. लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळविण्यापासून ते निवडणूक जिंकण्यापर्यंत त्यांनी सर्व कसब पणाला लावले होते. सर्वात मोठी रिस्क घेतानाही त्यांनी माण-खटावचा पाणीप्रश्न आणि सर्वांगीण विकास या मुद्यानांच प्राधान्य दिल्याचे लवकरच सर्वांना पहायला मिळणार आहे. त्यांनी मित्र म्हणून माझ्यासाठी खूप काही केले आहे. आता माझी वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही दोघे मिळून जिह्यातील आमच्या संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्ता आणि पदाधिकाऱयांचा स्वाभिमान जपणाराच निर्णय घेवू, असेही खासदार निंबाळकर यांनी सांगितले.।़

Related posts: