|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ‘हरणाई’च्या दातृत्वाचा आदर्श घ्या : मंत्री जानकर

‘हरणाई’च्या दातृत्वाचा आदर्श घ्या : मंत्री जानकर 

वार्ताहर/ औंध

दुष्काळ असो अथवा पूर लोकांच्या मदतीला धावून जाण्याचा हरणाई सूतगिरणी  व उद्योग समूहाच्या दातृत्वाचा आदर्श अन्य संस्था, उद्योजकांनी घ्यावा व पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहन दुग्ध व पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले.

येळीव (ता. खटाव) येथील हरणाई सूतगिरणी व उद्योग समूहाच्यावतीने सांगली जिल्हय़ातील पूरग्रस्त भिलवडी  येथील नागरिक, महिलांना जीवनावश्यक साहित्यांचे वाटप करण्यात  आले. त्यानंतर ग्रामस्थांशी संवाद साधताना ते बोलत होते. पूरग्रस्त गावातील नागरिक, महिलांना मंत्री जानकर, पृथ्वीराज देशमुख, हरणाईचे संस्थापक चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्यावतीने जीवनावश्यक साहित्य, साडय़ा, ब्लॅन्केट, बिसलरी, बिस्कीट बॉक्स देण्यात आले. यावेळी मामूशेठ वीरकर, राजूभाई मुलाणी, बाबा गोसावी, परेश जाधव, सुनील नेटके, डॉ. संतोष गोडसे, हणमंत भोसले, मारूती दबडे, राजू लोखंडे, पांडुरंग खाडे, तुषार ओंबासे, रवी शिंदे उपस्थित होते.

Related posts: