|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म. गो. पक्षातर्फे भाऊसाहेबांना आदरांजली

म. गो. पक्षातर्फे भाऊसाहेबांना आदरांजली 

वार्ताहर/ मडकई

भाऊसाहेब बांदोडकर यांच्या म. गो. पक्षात जो पर्यत सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर आहेत, तो पर्यंत या पक्षाला संपवण्याचे षड्यंत्र यशस्वी होणार नाही. पक्षाचे नेते, कार्यकर्ते व पदाधीकारी हे प्रयत्न उधळून लावतील. अन्य पक्षात असलेल्या कितीतरी नेत्यांना भाऊसाहेबांनी घडविले. मात्र असे नेते पुण्यतीथीदिनी त्यांचे स्मरण करुन  त्यांची त्तत्वे पायदतळी तुडवित आहेत, हे योग्य नाही असे प्रतिपादन म. गो. नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केले.

 फर्मागुडी येथे भाऊसाहेब बांदोडकर पुण्यतिथी कार्यक्रमात ते बोलत होते. सुदिन ढवळीकर व पक्षाच्या इतर पदाधिकाऱयांनी स्व. भाऊसाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.

 भाऊसाहेबांनी गोव्याच्या विकासाचा पाया घालताना सर्वंच क्षेत्रात उंतुग कार्य केले.  त्यांचे हे कार्य पुढे नेण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यानी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही  त्यांनी केले. यावेळी म. गो. पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, शिरोडा मतदार संघाचे नेते अभय प्रभू, जिल्हा पंचायत सदस्य चित्रा फडते, फोंडय़ातील युवा नेते केतन भाटीकर, म. गो. गटाध्यक्ष अनिल नाईक, मगो कार्यकर्ते दीपक नाईक, केंद्रिय समिती सदस्य सुमित वेरेकर, तसेच अन्य पदाधीकारी, मडकई मतदार संघातील आजी माजी सरपंच व पंचसदस्य उपस्थित होते.

  भाऊसाहेब बांदोडकर हे बहुजन समाजाचे तसेच गोव्याचे स्फूर्तीस्थान आहेत. मुक्तीनंतर राज्याच्या विकासासाठी त्यांनी शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले. त्यांच्या या दूरदृष्टीमुळेच गोव्याच्या विकासाला खऱयाअर्थाने चालना मिळाली. पक्षाचा विस्तार करण्यासाठी तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी एकसंघ राहावे असे आवाहन दीपक ढवळीकर यांनी केले.

Related posts: