|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा सुरक्षा मंच मांदेतर्फे भाऊंची पुण्यतिथी साजरी

गोवा सुरक्षा मंच मांदेतर्फे भाऊंची पुण्यतिथी साजरी 

पालये  /  वार्ताहर 

  गोवा सुरक्षा मंच मांदे व भारत माता की जय मांदे यांनी संयुक्तरित्या मांदे येथे भाऊसाहेब बांदोडकरांची पुण्यतिथी साजरी केली.

मांदे – देऊळवाडा येथील बांदोडकर उद्यानांत भाऊंच्या अर्धपुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.तदनंतर भाऊंच्या अजोड व सार्वभौम कार्याला यावेळी उजाळा देण्यात आला.यावेळी गोवा सुरक्षा मंच मांदेचे अध्यक्ष स्वरूप नाईक,कार्यवाहक विनायक च्यारी,गजानन मांदेकर,राया नाईक,अमित मोर्जे,साईदास नाईक,विणा च्यारी,गौरेश बगळी,सर्वेश कोरगांवकर,भोलेश नाईक व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान तत्पूर्वी रमाकांत खलप विद्यालयाचे विद्यार्थी व सप्तेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिगीत सादर करून भाऊंच्या पुतळय़ाला पुष्पा?जली वाहिली.यावेळी शिक्षक व अद्यापकवर्ग उपस्थित होता. 

Related posts: