|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोव्यात गुंतवणूक करा

गोव्यात गुंतवणूक करा 

रशियन उद्योजकांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यातील मच्छीमारी, खाण व इतर क्षेत्रात गुंतवणूक करा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रशियातील उद्योजकांना केले आहे. त्याचबरोबर रशियातील कामचटका राज्याच्या राज्यपालांबरोबर व्यापारासंदर्भात समन्वय करारही केला.

केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखालील उच्च पातळीवरील शिष्टमंडळात गुजरात बरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे देखील सहभागी झाले आहेत. महाराष्ट्रातील महापुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा आयत्यावेळी रद्द केला.

खाण, मच्छीमारीत गुंतवणुकीस संधी

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी रशिया दौऱया दरम्यान तेथील व्यापारी तसेच उद्योगपतींबरोबर चर्चा केली. राज्यात खाण व्यवसाय, मच्छीमारी व्यवसाय तसेच आयटी क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक करण्यास संधी आहेत. व उद्योगपतींनी गोव्याला भेट देऊन पहाणी करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यानीं व्यापाऱयांना केले.

मुख्यमंत्र्यांना चांगला प्रतिसादही मिळाला. तथापि, प्रत्यक्षात किती गुंतवणुकदार हे भारतात व विशेषतः गोव्यात येतील हे पहावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान व्यापारी सहकार्यासंदर्भात रशियातील कामचटकाच्या राज्यपालांबरोबर समन्वय करारही केला आहे. भारतातील व्यापारी आणि रशियातील व्यापारी यांच्यादरम्यान व्लादिवोस्टॉक-रशिया येथे खाण विषयक तसेच मत्स्योद्योग संदर्भातील बैठकीचे अध्यक्षपद आपण सांभाळल्याचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटद्वारे जाहीर केले आहे. उद्या दि. 14 रोजी मुख्यमंत्री गोव्यात परतणार आहेत.

Related posts: