|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अखेर राष्ट्रीय महामार्ग झाला खुला

अखेर राष्ट्रीय महामार्ग झाला खुला 

बेळगाव  / प्रतिनिधी

पावसाने खचलेला महामार्ग, तसेच त्यावर आलेले पुराचे पाणी यामुळे पुणे – बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग गेल्या आठ दिवसांपासून वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. त्यामुळे  प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते. आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तसेच महामार्गावरील पुराचे पाणी देखील ओसरले आहे. त्यामुळे पुणे – बेंगळूर महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

त्यामुळे सहा ते सात दिवसांपासून महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. महामार्ग बंद असल्याकारणाने वाहतूक ठप्प झाली होती. तसेच वाहनांच्या प्रचंड मोठय़ा रांगा लागल्या होत्या. दुसरा कोणताही पर्यायी मार्ग पुढे नसल्यामुळे सर्व वाहनधारकांना एकाच ठिकाणी कित्येक दिवस राहावे लागले.

आता आठ दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू झाल्यामुळे सर्व प्रवाशांसह व्यवसायिकांनाही दिलासा मिळाला आहे.