|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती सुरू

राष्ट्रीय महामार्गाची दुरूस्ती सुरू 

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डेही पडले आहेत.  पावसाने उघडीप दिल्याने बेळगाव ते कोल्हापूर मार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. हलगा येथील राष्ट्रीय महामार्गापासून ते गांधीनगर येथील ब्रिजपर्यंत पडलेले खड्डे व भेगा बुजविण्यात आल्या आहेत. तब्बल आठवडय़ाभरानंतर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला करण्यात आल्याने वाहनांची गर्दी झाली आहे.