|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बचाव कार्य पूर्ण…आता पूरग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या

बचाव कार्य पूर्ण…आता पूरग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई द्या 

प्रतिनिधी/ बेळगाव

पावसामुळे जिह्यातील 300 हून अधिक गावांना फटका बसला आहे. त्या गावांतील लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. 400 हून अधिक निवारा केंद्रे सुरू करण्यात आली. आता पाऊस काही प्रमाणात ओसरला असला तरी अजूनही पूरग्रस्तांना अन्न, पाणी, जनावरांचा चारा तसेच औषधे पुरवठा करणे गरजेचे आहे. सध्या बचाव कार्य पूर्ण झाले असून पूरग्रस्तांना सोयी-सुविधा पुरावाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकाऱयांनी केली आहे.

स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी 3 हजार 800 रुपयांचा धनादेश तातडीने देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. बँकांनीही त्यांना तातडीने ती रक्कम वितरित करावी, असेही सांगण्यात आले. सर्व तहसीलदार तसेच अधिकाऱयांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन पूरग्रस्तांशी विचारपूस करून त्यांना आवश्यक गोष्टी पुरवाव्यात, असे त्यांनी सांगितले. जिह्यातील काही तालुक्मयांमधील नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बेळगाव तालुक्मयातील 3 जणांचा या पावसामुळे मृत्यू झाला होता. त्यामधील दोन कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आले आहेत. बैलहोंगल येथील दोन, सौंदत्ती येथील 2, रामदुर्ग 2, गोकाक येथील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील एकाचा मृतदेह मिळाला नाही. याच बरोबर अथणी येथील 2 जणांचा मृत्यू झाला असून एकाचा मृतदेह मिळाला नाही. रायबाग येथील एकाचा मृत्यू झाला आहे. त्यांच्याही कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाणार आहे.

चाऱयाची सोय करा

पावसामुळे जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. तेव्हा तातडीने चारा खरेदी करून तो शेतकऱयांना द्यावा, असे जिल्हाधिकारी डॉ. बोम्मनहळ्ळी यांनी सांगितले. चारा केंद्रे सुरू करावीत, असेही त्यांनी कळविले आहे. पूरग्रस्तांना सर्व सुविधा पुरविण्याकडे अधिकाऱयांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे.

जिह्याच्या अप्पर मुख्य सचिवांचीही सूचना

जिह्यातील अनेक तालुक्मयात आलेला हा पूर अत्यंत गंभीर होता. सध्या जिल्हा प्रशासनातर्फे सर्व ते उपाय करण्यात आले आहेत. तरीदेखील तातडीने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याकडे लक्ष द्या, असे जिह्याचे अप्पर मुख्य सचिव रजनीश गोयल यांनी सांगितले.

पाठय़पुस्तके तसेच विद्यार्थ्यांना गणवेश यांची व्यवस्थाही तातडीने करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या पुरामुळे सर्वत्र दूषित पाणी झाले आहे. तेव्हा शुद्ध पाणी पुरवठा करण्याकडे अधिक भर द्या, अशी सूचना त्यांनी अधिकाऱयांना केली आहे.

आरोग्य खात्याने अधिक लक्ष देणे गरजेचे

पुरामुळे सर्वत्र दूषित वातावरण झाले आहे. पाणी पुरवठा करणे अशक्मय झाले आहे. तेव्हा आरोग्य विभागाने जातीने लक्ष द्यावे, असे जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. व्ही. राजेंद्र यांनी सांगितले. आता पुरानंतर साथीचे आजार पसरण्याची शक्मयता असते. त्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येक गावामध्ये डॉक्टर उपलब्ध करून आरोग्य सेवा देण्याच्यादृष्टीने पाऊल उचलावे, असे त्यांनी सांगितले.

या व्हिडीओ कॉन्फरन्सला अप्पर जिल्हाधिकारी एच. बी. बुदेप्पा, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, कृषी अधिकारी झिलानी मोकाशी, बैलहोंगलचे प्रांताधिकारी शिवानंद बजंत्री, तहसीलदार मंजुळा नाईक, बागायत खात्याचे अधिकारी रविंद्र हकाटी, तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.  

Related posts: