|Saturday, December 14, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शरद पवार उद्या रत्नागिरीत

शरद पवार उद्या रत्नागिरीत 

जिल्हा बँकेच्या नूतन प्रधान कार्यालयाचे उद्घाटन

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नाqिगरी qिजल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे बुधवारी रत्नागिरीत येत आहेत.  सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

याबाबत बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी सांगितले की, जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाची नूतन वास्तू तयार झाली आहे. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता या वास्तूचा उद्घाटन समारंभ शरद पवार व अन्य मान्यवरांच्या उप्रस्थितीत पार पडणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह मारुती मंदिर रत्नागिरी येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या कार्यक्रमाला सहकार मंत्री सुभाष देशमुख, पर्यावरण मंत्री रामदास कदम, पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, खासदार सुनिल तटकरे, हुसेन दलावाई, माजी खासदार तसेच बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आनंद अडसूळ, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, आमदार हुस्नबानू खलिफे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिकेत तटकरे, रत्नागिरीचे प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जि. प. अध्यक्षा स्वरुपा साळवी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, कार्यकारी संचालक जीवन गांगण यांच्यासह बँकेचा सर्व परिवार कार्यरत आहे.

Related posts: