|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘बिबटय़ाचा हल्ला’ पोलिसांच्या रडारवर

‘बिबटय़ाचा हल्ला’ पोलिसांच्या रडारवर 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी शहरानजीकच्या खेडशी-गवाणकरवाडी येथील मैथिली गवाणकर या 16 वर्षीय युवतीच्या खुनाचे गुढ अद्यापही कायम आहे. मैथिलीच्या खुनानंतर   ‘बिबटय़ाचा हल्ला’ झाल्याबाबत व्हायरल झालेली अफवा कोणी व का पसरवली? याबाबत कसून चौकशी सुरू आहे.

   खेडशी-गवाणकरवाडी जंगलामध्ये शेळय़ा चारण्यासाठी गेलेल्या मैथिली गवाणकर हिचा खून झाल्याची शुक्रवारी उघडकीस आली होती. डोक्यावर दगड घालून निर्घृणपणे तिचा खून करण्यात आला होता. यामागणे कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी प्रेमसंबंधातून हा खू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

   मैथिली हिचा खून झाल्याचे स्पष्ट उघड झाल्यानंतर बिबटय़ाच्या हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याची बातमी काही क्षणात गावातून सोशल मिडीयावर व्हायरल झाली. मात्र ती अफवाच असल्याचे पुढे येत आहे. बिबटय़ाच्या हल्ल्याची अफवा कशी व कुणी पसरवली याचीही तपासणी सुरू आहे. मैथिलीवर जर बिबटय़ाने हल्ला केला असता तर थोडीतरी झटापट झाली असती. पण तशाप्रकारच्या कोणत्याच खुणा तिच्या अंगावर तपास यंत्रणेला दिसून आलेल्या नाहीत. त्यामुळे पोलीसांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले आहे.

Related posts: