|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » leadingnews » सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा

सातारा, सांगली, कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

मागील आठ दिवसांपासून महापुराचा सामना करणाऱया सांगली आणि कोल्हापुरात आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे.

दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने पूर ओसरण्यास सुरूवात झाली आहे. मदतकार्य वेगाने सुरु आहे. त्यातच पुन्हा एकदा हवामान खात्याने सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्यातील घाट परिसरात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्मयता वर्तविली आहे.

मागील आठ दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातही पावसाने थैमान घातले आहे. पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर, सांगलीतील जनजीवन विस्कळीत झाले होते. सोमवारपासून पुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाल्याने जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येण्याची शक्मयता होती. मात्र, पुन्हा एकदा हवामान खात्याने या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये 13 आणि 14 ऑगस्ट रोजी पावसाच्या तुरळक सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Related posts: