|Monday, March 30, 2020
You are here: Home » Top News » चॅनेल निवडीसाठी ‘ट्राय’ आणणार स्वतंत्र ऍप

चॅनेल निवडीसाठी ‘ट्राय’ आणणार स्वतंत्र ऍप 

ऑनलाईन टीम / पुणे : 

डीटीएच आणि केबलधारकांना चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य देऊनही त्यांना हवे ते चॅनेल पुरविले जात नसल्याने दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) स्वतंत्र ऍप तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

केबल आणि डीटीएचधारकांना कंपन्यांकडून हवे ते चॅनेल्स न पुरवण्याचे प्रकार वारंवार घडतात. ट्रायने ब्रॉडकास्टिंगसंदर्भात नवे धोरण लागू करून आठ महिने उलटल्यानंतरही ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यावर उपाय म्हणून ट्रायने हा निर्णय घेतला आहे.

डीटीएच आणि केबल सेवा पुरवणाऱया अनेक कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईट किंवा ऍप्सवर स्वतंत्र चॅनेल निवडीची सुविधा उपलब्ध करावी, असे आदेश ट्रायने देऊनही अद्याप अनेक कंपन्यांनी चॅनेलचे स्वातंत्र्य ग्राहकांना दिलेले नाही. त्यामुळे ट्रायने ग्राहकांना वापरासाठी सोपे असलेले ऍप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Related posts: