|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » मिरज : गणेशोत्सवासाठीच्या स्वागतकमानी रद्द करून निधी पूरग्रस्तांना

मिरज : गणेशोत्सवासाठीच्या स्वागतकमानी रद्द करून निधी पूरग्रस्तांना 

ऑनलाइन टीम / मिरज : 

महापुरामुळे कोटय़ावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत करणे गरजेचे आहे. ही सामाजिक गरज ओळखून शिवसेना, अखिल भारतीय मराठा महासंघाने यंदा गणेशोत्सवामध्ये स्वागत कमान उभी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तो निधी पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

मंगळवारी मिरजेत मराठा महासंघाची व शिवसेनेची अशा दोन स्वतंत्र बैठका झाल्या. गणेशोत्सवाच्या काळामध्ये नऊ ठिकाणी मिरजेत स्वागत कमानी उभारल्या जातात. यामध्ये शिवसेना व अखिल भारतीय मराठा महासंघाचीही स्वागत कमान असते. सध्याच्या महापुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शिवसेना व मराठा महासंघाने यंदा स्वागत कमान न उभारण्याचा निर्णय घेतला.

मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष नेताजी सुर्यवंशी म्हणाले, स्वागत कमानी ऐवजी स्वागत कक्ष उभारण्यात येईल. त्यामध्ये पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी मदतीचे आवाहन करण्यात येईल. जमणारा निधी शासनाकडे देण्यात येईल.