|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » उल्हासनगरात पाच मजली इमारत कोसळली; अनर्थ टळला

उल्हासनगरात पाच मजली इमारत कोसळली; अनर्थ टळला 

ऑनलाईन टीम / उल्हासनगर :

उल्हासनगरच्या कॅम्प तीनमधील ‘महक अपार्टमेंट’ नावाची पाच मजली इमारत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. इमारतीला तडे गेल्याने कालच महापालिकेने ही इमारत रिकामी करुन अंदाजे 100 जणांना स्थलांतरित केले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

या इमारतीला तडे गेल्याचे काल स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दल आणि महापालिकेला याची माहिती दिली. महापालिकेच्या अधिकाऱयांनी घटनास्थळी इमारतीची पाहणी करुन सुरक्षिततेच्या कारणास्तव इमारतीमधील 31 फ्लॅटमधील अंदाजे 100 लोकांना स्थलांतरित करून इमारत सील केली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही इमारत कोसळली. प्रशासनाने दाखविलेल्या दक्षतेमुळे अनेकांचे प्राण वाचले.

Related posts: