|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » विमानात बिघाड : गडकरी यांचा दिल्ली दौरा रद्द

विमानात बिघाड : गडकरी यांचा दिल्ली दौरा रद्द 

ऑनलाइन टीम / नागपूर : 

नागपूरहून दिल्लीला रवाना होणाऱया इंडिगो विमान 6ई 636 मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमानाचे उड्डान रद्द करण्यात आले. त्यांनतर विमान धावपट्टीवरुन टॅक्सीवेकडे नेण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. विमानाची ही फेरी रद्द करण्यात आली आहे. विमानातील प्रवाशांसोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीदेखील
प्रवास करत हाते. पण गडकरी यांना दिल्ली दौरा रद्द करावा लागाला.

नितीन गडकरी दिल्ली येथे केंद्रीय कॅबिनेटची दुपारी 11 वाजता होणाऱया बैठकीमध्ये उपस्थिती लावणार होते. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, ऐनवेळी विमानात बिघाड झाल्याचे समजल्याने गडकरी यांनी विमानतळाहून घरी परतण्याचा निर्णय घेतला.

 

Related posts: