|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » शरद पवार पूरग्रस्तांसोबत साजरा करणार स्वातंत्रदिन

शरद पवार पूरग्रस्तांसोबत साजरा करणार स्वातंत्रदिन 

ऑनलाइन टीम / कोल्हापूर : 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार 14 आणि 15 ऑगस्टला सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱयावर जाणार आहेत. या दोन्ही जिह्यातील पूरग्रस्त गावांमध्ये जाऊन सुरु असलेले मदतकार्य आणि लोकांची भेट घेणार आहेत. दरम्यान शरद पवार 15 ऑगस्ट रोजी शिरोळ येथे पूरग्रस्तांसोबत स्वातंत्रदिन साजरा करणार आहेत.

कोल्हापूर-सांगलीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या महापूरात अनेकांचे संसार उघडय़ावर पडले आहेत. पूर जरी ओसरत असला तरी यानंतरच्या संकटांला पूरग्रस्तांना सामोरे जावे लागत आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था. दानशून व्यक्तींसह राजकीय पक्ष देखील पुढे सरसावले आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली जात आहे.

 

Related posts: