|Saturday, December 14, 2019
You are here: Home » Top News » माजी आमदाराचा सुनेवर बलात्कार; गुन्हा दाखल

माजी आमदाराचा सुनेवर बलात्कार; गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भाजप नेते आणि माजी आमदारावर कथित बलात्कार आणि धमकीचा गुन्हा दिल्ली पोलिसांनी दाखल केला आहे.

रघुवेन्द शौकीन असे या माजी आमदाराचे नाव आहे. पीडित सुनेने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. आरोपी हे नांगलोई विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर 2018 ची पार्टी संपल्यानंतर 1 जानेवारी 2019 च्या मध्यरात्री आरोपी सासऱयाने बंदुकीचा धाक दाखवून हे लाजीरवाणे कृत्य केल्याचे सुनेने म्हटले आहे.

31 डिसेंबर 2018 रोजी मी माहेरी असताना पती न्यायला आले. त्यांनी मला घरी न नेता एका हॉटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी नववर्षाची पार्टी आटोपल्यावर सर्वजन घरी गेले. माझे पती मित्रांसोबत निघून गेले. त्यामुळे मीही माझ्या खोलीत झोपायला गेले. त्याचवेळी, मध्यरात्री 1.30 वाजता माझ्या सासऱयांनी मला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर, दारूच्या नशेत बंदुकीचा धाक दाखवत त्यांनी माझ्यावर बलात्कार केला, असा आरोप पीडिताने पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे.

Related posts: