|Thursday, August 22, 2019
You are here: Home » leadingnews » पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे 6800 कोटींची मागणी 

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महापूरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेल्या सातारा, सांगली, कोल्हापुरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे 6800 कोटींच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूरग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

आठ दिवस महापुराने वेढलेल्या कोल्हापूर आणि सांगली भागातील अनेक घरे पडली आहेत. घरातील सर्व साहित्य वाहून गेले आहे. जे साहित्य शिल्लक आहे ते वापरायोग्य नाही. त्यामुळे राज्य सरकाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 6800 कोटींची मदत मागीतली आहे.

फडणवीस म्हणाले, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 6 हजार कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये पिकांच्या नुकसानीसाठी 2 हजार 88 कोटी रुपये, सार्वजनिक आरोग्य आणि अतिरिक्त मनुष्यबळ 75 कोटी, पडलेली घरे पूर्णपणे बांधून देणार आहोत. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 576 कोटी रुपये देण्याचा निर्णय आहे. तर तात्पुरत्या छावण्यांसाठी 27 कोटी, जनावरांसाठी 30 कोटी, स्वच्छतेसाठी 79 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.