|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘सेक्रेड गेम्स’ मध्ये अमेय वाघ खलनायकाच्या भूमिकेत

‘सेक्रेड गेम्स’ मध्ये अमेय वाघ खलनायकाच्या भूमिकेत 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

‘सेक्रेड गेम्स’ वेब सीरिजचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘सेक्रेड गेम्स’च्या पुढच्या सीझनमध्ये कोण कलाकार असतील हे जाहीर करण्यात आलं असून, यात आणखी एका मराठी नावाची सिक्रेड एंट्री झाली आहे. अभिनेता अमेय वाघ अमेय ‘सेक्रेड गेम्स’च्या दुसऱया सीझनमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

अमेय म्हणाला, ‘सेक्रेड गेम्स’ ही माझ्या आवडीच्या वेब सीरिजपैकी एक आहे. अशा सीरिजमध्ये काम करायला मिळावं ही माझी इच्छा होतीच. मी काही ऑडिशन दिल्या आणि माझी एका भूमिकेसाठी निवड झाली. माझा ट्रक दिग्दर्शक नीरज घेवान यांनी दिग्दर्शित केलाय. त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘मसान’ या सिनेमाचा मी फॅन आहे. त्यामुळे अशा दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचं एक नट म्हणून खूप समाधन मिळतंय.