|Saturday, December 14, 2019
You are here: Home » Top News » पाक क्रिकेटपटू हसन अली 20 ऑगस्टला विवाहबंधनात

पाक क्रिकेटपटू हसन अली 20 ऑगस्टला विवाहबंधनात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली भारतीय मुलीसोबत 20 ऑगस्ट रोजी लग्नबेडीत अडकणार आहे.

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्माला आलेला हसन अली आणि हरियाणाची निवासी शामिया यांचा विवाह दुबईच्या एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये होणार आहे. या विवाहासाठी शामियाच्या परिवारातील सदस्य 17 ऑगस्टला दुबईला रवाना होणार आहेत.

शामिया आणि हसन अली यांचे जुने पारिवारिक संबंध आहेत. शामियाचे वडील लियाकत हे पाकिस्तानचे माजी खासदार सरदार तुफैले आणि त्यांचे बाबा सख्खे भाऊ होते. फाळणीनंतर त्यांचा परिवार भारतात आला तर तुफैले यांचा परिवार पाकिस्तानमध्ये स्थायिक झाला. त्यामुळे शामिया आणि हसन अली यांची ओळख झाली. शामियाने मानव रचना युनिव्हर्सिटीतून एरॉनॉटिकल इंजिनियरिंग पूर्ण केले आहे. ती सुरुवातीला जेट एअरवेजमध्ये होती. गेल्या तीन वर्षांपासून ती एअर अमीरातमध्ये काम करत आहे. तर हसन अलीने 2013 मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यानंर 2016 मध्ये पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. 2017 च्या चॅम्पयिन ट्रॉफी संघातही त्याला समावेश करण्यात आला होता.

Related posts: