|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » जम्मू-काश्मिरमधील सैनिकांकरीता पुण्यातून चॉकलेटच्या राख्या

जम्मू-काश्मिरमधील सैनिकांकरीता पुण्यातून चॉकलेटच्या राख्या 

पुणे / प्रतिनिधी :

भारत माता की जय… वंदे मातरम् च्या जयघोषात आणि दृष्टीहिन मुलांनी केलेल्या पूजनानंतर जम्मू – काश्मिरमधील सैनिकांकरीता खास तयार केलेल्या चॉकलेटच्या राख्या पुण्यातून रवाना झाल्या. हम सब एक है… चा संदेश देत आम्ही पुणेकर संस्था जम्मू-काश्मिरमधील विविध भागांत रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. त्या भाईचारा दिनाचा शुभारंभ पुण्यातून चॉकलेटच्या राख्यांच्या पूजनाने झाला.

आम्ही पुणेकर या संस्थेच्या वतीने जनरल झोरावर सिंग ट्रस्ट जम्मू व मूर्तीज् पद्मसुंदर बेकरीच्या सहकार्याने पुण्यातून जम्मू-काश्मिरमधील सैनिकांकरीता चॉकलेटच्या राख्या पाठविण्यात येत आहेत. त्या राख्यांचे पूजन सोमवार पेठेतील सुयश हॉटेलसमोर असलेल्या पद्मसुंदर बेकरी येथे झालेल्या कार्यक्रमात दृष्टीहिन मुले व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

पं.वसंतराव गाडगीळ म्हणाले, देशाच्या सिमेवरील वातावरण अनेकदा तणावपूर्ण असते. सध्या संसदेमध्ये संमत झालेल्या 370 कलमामुळे देखील तेथे तणावपूर्ण शांतता आहे. त्यात आपण पुणेकरांनी सैनिकांना राख्या पाठविल्यामुळे आपले प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. दिव्यांग मुलांनी या उपक्रमात सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला वेगळी उंची प्राप्त झाली आहे.

हेमंत जाधव म्हणाले, जम्मू-काश्मिरमधील सांबा सेक्टर, डोडा, रियासीसह विविध भागांतील सैनिकांना या राख्या आम्ही बांधणार आहोत. नेहमीच्या राख्यांपेक्षा चॅकलेटच्या राख्या यंदा जवानांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाकरीता अनेक संस्थांनी सहकार्य केले असून जम्मू काश्मिरमधील सामाजिक संस्था देखील सहभागी होणार आहेत. रक्षाबंधन आणि स्वातंत्रदिनी हे कार्यक्रम सैनिकांसोबत पुणेकर साजरे करणार आहेत.

 

Related posts: