|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी मातंग समाजाचे शिष्टमंडळ पंतप्रधनांना भेटणार : आठवले

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी मातंग समाजाचे शिष्टमंडळ पंतप्रधनांना भेटणार : आठवले 

पुणे / प्रतिनिधी : 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आजच्या तरुणाईबद्दल भाष्य करण्यासाठी केलेल्या विडंबनात्मक काव्याचा विपर्यास करून काही मंडळींनी मातंग आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधनसभा निवडणुकीत रिपब्लकिन पक्षाकडून पिंपरीची जागा देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

पिंपरीची जागा आरपीआयला मिळू नये, यासाठीच काही धर्मांध शक्तींनी माझ्या वाक्याचा विपर्यास केला. तरीही माझ्या अनावधने केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱया मजकुरावर मातंग आणि बौद्ध समाजाने अवलंबून न राहता सामाजिक एकोपा जपावा, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लकिन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न मिळण्यासाठी पुढाकार घेणार असून, लवकरच मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी बैठकीवेळी दिले.

रिपब्लकिन मातंग आघाडीचे हनुमंत साठे यांच्या पुढाकारातून मंगळवारी सकाळी रामदास आठवले आणि मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांची नवीन विश्रामगृहात संयुक्त बैठक झाली. त्यावेळी आठवले बोलत होते.

हनुमंत साठे म्हणाले, बौद्ध व मातंग समाजाचे एकत्रीकरण आणि समाजात बंधुभाव वाढण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या घराचे काम आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत साठे व अंकल सोनावणे यांच्या नेतृत्वात 1991 मध्ये वाटेगाव येथे झाले होते. याशिवाय लावणीसम्राज्ञी विठाबाई मांग नारायणगावकर यांच्या तमाशाला पुनर्जीवित करण्यात आठवले साहेबांचा पुढाकार होता. यातूनच आठवले यांचे मातंग समाजाविषयीची आपुलकीची भावना दिसते. त्यामुळे मातंग समाजाने आठवले यांच्या पाठीशी राहावे.

 

Related posts: