|Thursday, August 22, 2019
You are here: Home » Top News » मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पूरग्रस्तांना देणार एक महिन्याचा पगार

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पूरग्रस्तांना देणार एक महिन्याचा पगार 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिह्यात आलेल्या पुरामुळे अनेक लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या लोकांच्या मदतीला राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पूरग्रस्तांसाठी याआधीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार, आमदारांनी एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तर भाजपा लोकप्रतिनिधींनी एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना द्यावं अशी सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे तर शिवसेनेकडूनही नगरसेवक, आमदार, खासदार यांचे एक महिन्याचं वेतन पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.