|Saturday, December 14, 2019
You are here: Home » Top News » कॉमनवेल्थ 2022 : महिला क्रिकेटचा समावेश

कॉमनवेल्थ 2022 : महिला क्रिकेटचा समावेश 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :

बर्मिंघम येथे 2022 मध्ये होणाऱया राष्ट्रकुल कॉमनवेल्थ खेळामध्ये महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि कॉमनवेल्थ गेम्स फेडरेशनने याची घोषणा केली आहे. बर्मिंघममध्ये होणाऱया कॉमनवेल्थ खेळात महिला टी- 20 चा समावेश करण्यात आला असून यात 8 आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ सहभागी होणार आहेत.

1998 नंतर पहिल्यांदाच क्रिकेटचा कॉमनवेल्थ खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यावेळी क्वालांलपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वनडे सामन्यात सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी जॅक्स कॅलिस, रिकी पाँटिंग आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला होता. कॉमनवेल्थ गेम्समध्ये क्रिकेटच्या सामन्याला 27 जुलैपासून सुरुवात होणार असून ते 7 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत.

 

Related posts: