|Monday, January 27, 2020
You are here: Home » Top News » बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी घसरले

बाजार पुन्हा गडगडला; सेन्सेक्स, निफ्टी घसरले 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

जगभरात झालेल्या उलाढालीचे पडसाद भारतात उमटले आहेत. आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठय़ा कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. दुपारी 3 वाजेपर्यंत सेन्सेक्स 600 अंकांच्या घसरणीसह 37 हजारांच्या खाली आला. तर निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 11 हजारांच्या खालीपर्यंत आला.

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअरचा सेन्सेक्स 173 अंकांने उसळून तो 37 हजार 755 अंकांवर उघडला. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एल ऍड टी आणि आयटीसी यासारख्या मोठय़ा कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. येस बँकेचे शेअर 52 आठवडय़ाच्या खाली घसरले. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सने या दशकातील सर्वात मोठी उसळी घेतली.

 

Related posts: