श्वेता तिवारीला मारहाण, पती अभिनव कोहलीला अटक

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीला आपला पती अभिनव कोहलीकडून छळाला सामोरे जावे लागले आहे. तिने आपल्या पतीवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीचा आरोप केला आहे. श्वेता तिवारीने पती अभिनव कोहलीविरोधत पोलिसांत तक्रार दिली होती. याप्रकरणी अभिनव कोहलीला अटक करण्यात आली आहे.
श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. श्वेताच्या मुलीला मारहाण केल्याप्रकरणी तिने कांदिवलीच्या समता नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
दारुच्या नशेत अनेकदा मला आणि मुलीला मारहाण केल्याचा आरोप श्वेताने केला आहे. पोलिसांनी चार तासांच्या चौकशीनंतर अभिनवला अटक केली आहे. मुलगी पलक हिला मोबाईलवर अश्लील फोटो दाखवून तिला शिवीगाळ करत असल्याचेही श्वेताने सांगितले.
Related posts:
Posted in: मनोरंजन