|Saturday, December 14, 2019
You are here: Home » उद्योग » जिओची मायक्रोसॉफ्टसोबत लवकरच हात मिळवणी

जिओची मायक्रोसॉफ्टसोबत लवकरच हात मिळवणी 

एकत्रित डिजिटल विकासाला चालना देणार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मायक्रोसॉफ्ट या दोन्ही कंपन्या आगामी काळात भारतात डिजिटल क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. सध्या या दोन्ही कंपन्यामध्ये करार करण्यात आला असून हा करार 10 वर्षांसाठी करण्यात आलेला आहे. या कारारानंतर मायक्रोसॉफ्ट वैयक्तिक माहितीची साठवणूक देशात करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

विकासात्मक बदल

जिओ आपल्या विना नेटवर्क ऍप्लिकेशन मायक्रोसॉफ्ट स्टार्टअपच्या आधारे सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. तर असा व्यवहाराची पहिलीच वेळ असून याचा लाभ येणाऱया काळात होणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

माहिती साठवण्याचे संकेत

देशामध्येच ग्राहकांची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठीची सुविधा उपलब्ध करावी लागणार आहे. त्यासाठी जिओ डेटा सेंटरची निर्मिती करणार असल्याची माहिती यावेळी दिली आहे. सदरचे सेंटर गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात आगामी काळात उभारणार असल्याचे सांगितले आहे.

Related posts: