|Saturday, December 14, 2019
You are here: Home » उद्योग » वेतन कमाईत आदित्य पुरी सर्वोच्च

वेतन कमाईत आदित्य पुरी सर्वोच्च 

मुंबई

 देशातील बँकिंग क्षेत्र मागील दिवसांपासून घोटाळे, थकीत कर्जे व रिझर्व्ह बँकेकडून होणारी व्याजदर कपात यामुळे चर्चेत राहिले आहे. परंतु सध्या आपण वेगळय़ा अंगाने बँकिंग क्षेत्राची माहिती घेणार आहोत. यात मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना मिळणाऱया वेतना संदर्भात माहिती घेणार आहोत.

देशातील सर्वाधिक मुळ वेतन मिळवण्यात एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पुरी यांनी बाजी मारली आहे. आर्थिक वर्ष 2018-19 या कालावधीत प्रत्येक महिन्याला पुरी यांना 89 लाख रुपये इतके मुळ वेतन असून त्यांनी मुळ वेतन कमाईत बाजी मारली आहे. तर ऍक्सिस बँकेचे अमिताभ चौधरींना 30 लाख मुळ वेतनासह दुसऱया स्थानी राहिलेत.

सर्वाधिक मुळ वेतन घेणाऱया प्रमुखांची यादी

1 एचडीएफसी बँक

आदित्य पुरी     89 लाख रुपये

2 ऍक्सिस बँक

अमिताभ चौधरी  30 लाख रुपये

3 कोटक महिंद्रा बँक        

उदय कोटक    27 लाख रुपये

4 आयसीआयसीआय
(माजी सीईओ)

चंदा कोचर             26 लाख रुपये

5आयसीआयसीआय बँक (उत्तराधिकारी)

संदीप बख्शी           22 लाख रुपये

6 इंडसइंड बँक

रोमेश सोबती    16 लाख रुपये

 

Related posts: