|Saturday, December 14, 2019
You are here: Home » उद्योग » ऑटो क्षेत्रात 18 वर्षातील सर्वाधिक घसरण

ऑटो क्षेत्रात 18 वर्षातील सर्वाधिक घसरण 

जुलैमध्ये प्रवासी वाहन विक्री 31 टक्क्यांनी घसरली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑटोमोबाईल क्षेत्रात चालू वर्षातील जुलै महिन्यात एकूण 200790 प्रवासी वाहनांची विक्री झालेली आहे. मागील वर्षात याच महिन्यात 290930 इतकी वाहन विक्री झाली होती. परंतु सध्याचा वाचार केल्यास खुप मोठी ऑटो क्षेत्रात वाताहात  झाल्याचे चित्र यात जुलैमध्ये दुचाकीची विक्री 16.82 टक्क्यांनी घसरण होत 1511692 राहिली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 1817406 इतकी दुचाकीची विक्री झाली होती. अवजड, मध्यम आणि हलक्या व्यावसायिक वाहनांची विक्री जुलै 2019 मध्ये 25.71 टक्क्यांनी कमी होत 56,866 वर पोहोचली आहे. हाच आलेख जुलै 2018 मध्ये 76,545 राहिला होता. तर तीन चाकी वाहनांची विक्री 7.66 टक्क्यांनी खाली येत 55,719 वर राहिलेली आहे.

13 लाख लोक बेरोजगार

ऑटो क्षेत्रातील मंदीमुळे  13 लाख जणांना आपले रोजगार गमवावे लागलेत. देशातील 300 एजन्सीज शोरुम बंद पडले आहेत. यामुळेच 2 लाख रोजगारांना मुकावे लागले आहे.  ओरिजनल इक्यूपमेट मॅन्युफॅक्चिर्स (ओइएमएस) क्षेत्रातील जवळपास 15 हजार रोजगार गेल्याचे नोंदवले.

 

Related posts: