|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग » दुसऱया सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला

दुसऱया सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळला 

मोठय़ा कंपन्यांचे समभाग गडगडले : निफ्टी 11 हजारच्या खाली

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक पातळीवरील होत असलेल्या घडामोडीमुळे मंगळवारी शेअरबाजारात मोठी घसरण झाली असून सेन्सेक्स 623 अंकांनी कोसळला आहे. त्यामुळे मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स निर्देशाक 36958.16 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 183.80 अंकांनी घसरत 10925.85 अंकांवर स्थिरावला. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठय़ा कंपन्यांचे शेअर्सही गडगडले. शेअरबाजारात कमकुवत विदेशी संकेतांमुळे आणि वाहनांच्या विक्रीत सतत 9 व्या महिन्यांच्या घसरणीमुळे बाजारात विक्री पाहायला मिळाली.

मुंबई शेअरबाजार निर्देशांकाच्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 173.25 अंकांनी उसळी घेऊन 37,755.16 वर उघडला होता. सेन्सेक्समध्ये एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि आयटीसी या मोठय़ा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. येस बँकेचे शेअर्स 52 आठवडय़ांच्या नीच्चांकी पातळीवर घसरले.

दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सने सर्वात मोठी उसळी घेतली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने 18 महिन्यामध्ये स्वतःला कर्जमुक्त करण्यासह तेल आणि पेट्रो केमिकलच्या व्यवसायाची भागीदारी सौदी अरेबियातल्या अराम्को कंपनीला विकण्याची केलेली घोषणा आणि जिओ फायबरची करण्यात आलेल्या सुरुवातीमुळे रिलायन्सच्या शेअर्सने उच्चांकी पातळी गाठली आहे. देशातले प्रमुख शेअरबाजार सोमवारी बकरी ईदमुळे बंद होते.

आंतरराष्ट्रीय प्रभाव

मुंबई शेअर बाजारावर मंगळवारी आंतरराष्ट्रीय घडामोंडीचा परिणाम झाल्याचे पहावयास मिळाले आहे. यात अमेरिका चीन व्यापार युद्ध , हॉगकॉग येथे झालेले आंदोलन, अर्जेटिनाच्या चलनात मोठी घसरण  आणि भारतीय रुपयामध्ये डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण या घटनांचा मोठा प्रभाव राहिल्याचे पहावयास मिळाल्याने मुंबई बाजारात मोठी घसरणीची नोंद करण्यात आली असल्याची माहिती तज्ञांनी दिली आहे.

Related posts: