|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » फ्रान्सच्या गॅसकेटकडून अँडी मरे पराभूत

फ्रान्सच्या गॅसकेटकडून अँडी मरे पराभूत 

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी मास्टर्स पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटने ब्रिटनच्या अँडी मरेला पराभवाचा धक्का दिला.
सोमवारी येथे झालेल्या पुरूष एकेरीच्या सामन्यात रिचर्ड गॅसकेटने अँडी मरेचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. दुखापतीमुळे मरेचे टेनिस क्षेत्रामध्ये तब्बल सात महिन्यानंतर पुनरागमन या स्पर्धेत झाले होते. गेल्या जानेवारीत ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत मरेला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. गॅसकेटने हा सामना 96 मिनिटात जिंकला.