|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » क्रिडा » अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत कुझेनत्सोव्हाला स्थान

अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत कुझेनत्सोव्हाला स्थान 

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

26 ऑगस्टपासून येथे सुरू होणाऱया 2019 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेत रशियाच्या स्वेतलाना कुझेनत्सोव्हाचा महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये समावेश झाल्याची घोषणा अमेरिकन टेनिस संघटनेने केली आहे.

या स्पर्धेतून डॉम्निका सिबुलकोव्हाने डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे शेवटच्याक्षणी माघार घेतल्याने स्पर्धा आयोजिकांनी रशियाच्या कुझेनत्सोव्हाला महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये संधी दिली आहे. त्याचप्रमाणे पुरूष एकेरीत या स्पर्धेत मॅकडोनाल्डने दुखापतीमुळे आपण उपलब्ध होऊ शकणार नाही, असे कळविल्याने स्पर्धा आयोजकांनी पुरूष एकेरीच्या प्रमुख ड्रॉ मध्ये अल्बर्ट रॅमोस-व्हिनोलासचा समावेश केला आहे. रशियाच्या कुझेनत्सोव्हाने 2004 साली अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम तर 2009 साली प्रेंच ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली होती.

Related posts: