|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू ब्राऊन कालवश

अर्जेंटिनाचे माजी फुटबॉलपटू ब्राऊन कालवश 

ब्यूनोस आयरीस

1986 साली फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया अर्जेंटिना संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱया जोस लुईस ब्राऊन यांचे सोमवारी येथे वयाच्या 62 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

1986 साली विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पश्चिम जर्मनीविरूद्ध अर्जेंटिनाचा पहिला गोल ब्राऊन यांनी नोंदविला होता. ब्राऊन यांनी 36 आंतरराष्ट्रीय सामन्यात अर्जेंटिनाचे प्रतिनिधीत्व केले होते. 1986 साली पश्चिम जर्मनीविरूद्धच्या अंतिम सामन्यात ब्राऊन यांनी 23 व्या मिनिटाला हेडरद्वारे आपला एकमेव आंतरराष्ट्रीय गोल नोंदविला होता. अर्जेंटिनाने या सामन्यात पश्चिम जर्मनीचा 3-2 असा पराभव करून विश्वकरंडक स्पर्धा जिंकली होती. अर्जेंटिना फुटबॉल फेडरेशनने ब्ा्राऊन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.