|Friday, November 15, 2019
You are here: Home » क्रिडा » महिला फुटबॉल लीगची व्याप्ती वाढणार

महिला फुटबॉल लीगची व्याप्ती वाढणार 

वृत्तसंस्था/ कोलकाता

भारताच्या पुरुष फुटबॉल क्षेत्रातील वादावर सध्या प्रकाशझोत असला तरी महिला फुटबॉल संघ नवीन माईलस्टोन गाठण्याचे काम प्रामाणिकपणे सुरू ठेवले आहे. गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या फिफाच्या क्रमवारीत सहा स्थानांची प्रगती करीत 57 वे स्थान मिळविण्याचा पराक्रमही त्यांनी केला आहे. त्यामुण्s महिलांच्या फुटबॉल लीगची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता 24 संघांना सामील करून घेण्याची योजना फेडरेशनने तयार केली आहे.

गेल्या जानेवारीपासून झालेल्या पहिल्या 18 सामन्यांत त्यांनी 66.7 टक्के विजयाची सरासरी राखल्याने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला त्याची दखल घ्यावी लागली आणि महिला फुटबॉल आणखी विकसित होण्यासाठी व त्याच्या भवितव्यासाठी काही योजना आखणे त्यांना भाग पडले आहे. 2017 पासून सुरू झालेल्या इंडियन वुमेन्स लीगचा (आयडब्ल्यूएल) कालावधी वाढविण्याचा निर्णय त्यांनी आता घेतला आहे. यावषीं मेमध्ये झालेल्या तिसऱया आवृत्तीत 12 संघांचा सहभाग होता आणि ती स्पर्धा फक्त 19 दिवसांत पूर्ण झाली होती. पण पुढील वर्षापासून या कालावधीत वाढ होणार आहे. ‘यासाठी एआयएफएफचे तांत्रिक संचालक डोरु इसाक यांनी लीग विभागासह नवी योजना आखली आहे. आता या लीगमध्ये 24 संघांना सामील करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून प्रत्येक संघाला 18 सामने खेळावयास मिळणार आहेत,’ असे एआयएफएफचे सरचिटणीस कुशल दास यांनी सांगितले.

भारतीय महिलांना अनेक स्पर्धांत खेळण्याची संधी मिळाल्याने त्यांच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली असून ऑलिम्पिक पात्रतेमध्ये दुसऱया फेरीपर्यंत मजल मारत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. गोलसरासरीत कमी पडल्याने भारतीय महिलांना तिसऱया फेरीत स्थान मिळू शकले नाही. त्यांच्या कामगिरीत आणखी सुधारणा होण्यासाठी कमी कालावधीचे व दीर्घ कालावधीच्या काही योजना आखण्यात आल्या आहेत,’ असे माजी फुटबॉलपटू व एआयएफएफचे राष्ट्रीय संघाचे संचालक अभिषेक यादव म्हणाले. एएफसी आशियाई चषक 2022 साठी पात्रता मिळविणे हे प्रथम लक्ष्य असून पुढील वर्षी पात्रता फेरीचे सामने सुरू होणार आहेत. 2026 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळविणे हे आमचे मोठे ध्येय असल्याचे कुशल दास यांनी सांगितले.

Related posts: