|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » प्रमुख प्रशिक्षकाची निवड शुक्रवारी

प्रमुख प्रशिक्षकाची निवड शुक्रवारी 

सहा उमेदवारांची यादी जाहीर, साहाय्यक स्टाफचीही निवड होणार

वृत्तसंस्था/मुंबई

भारतीय संघाच्या प्रमुख प्रशिक्षक व अन्य साहाय्यकांची निवड येत्या शुक्रवारी कपिलदेवच्या त्रिसदस्यीय समितीमार्फत केली जणारी असून यासाठी आलेल्या अर्जांची छाननी करून सहा जणांची यादी तयार करण्यात आली आहे. या सहा जणातं माईक हेसन, टॉम मुडी, रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, फिल सिमॉन्स, रवि शास्त्री यांचा समावेश आहे.

बीसीसीआयने सोमवारी या सहाही उमेदवारांना मुलाखतीसंदर्भात वेळ व तारीख कळविली आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व प्रमुख प्रशिक्षक अशा विविध प्रशिक्षक पदांसाठी एकूण 2000 अर्ज बीसीसीआयकडे दाखल झाले होते. यापैकी प्रमुख प्रशिक्षक पदासाठी फक्त काही नामवंतांनीच अर्ज दाखल केले होते. साहाय्यक स्टाफची (फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक) निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद करणार आहेत.

सध्या तरी प्रमुख प्रशिक्षकपद रवि शास्त्री यांच्याकडेच कायम राहणार, असे चित्र आहे. कारण कर्णधार कोहलीचाही त्यांनाच पाठिंबा आहे. शास्त्री सध्या र्विडीज दौऱयावर संघासोबत असून या दौऱयानंतर त्यांचा करार संपुष्टात येणार आहे. क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) या संदर्भात कोहलीच्या मताला प्राधान्य देण्याची दाट शक्यता आहे. शास्त्रींची मुलाखत स्काईपच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. सीएसीमध्ये अध्यक्ष कपिलदेव, अंशुमन गायकवाड व माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे.

अन्य उमेदवारांपैकी ऑस्ट्रेलियाचे माजी अष्टपैलू टॉम मुडी हे गेल्या सहा वर्षांपासून आयपीएलमधील सनराजर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सनराजर्सने 2016 मध्ये आयपीएलचे जेतेपद आणि 2018 मध्ये उपविजेतेपद मिळविले होते. लालचंद राजपूत यांनी भारत, भारत अ, अफगाणिस्तान या संघांचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले असून सध्या ते झिम्बाब्वे संघाचे प्रशिक्षक आहेत. सोमवारी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्लोबल टी-20 लीगमध्ये विनिपेग प्रँचायजीने जेतेपदही पटकावले. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेवेळी ते भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्यानंतर 2008 मध्ये ऑस्ट्रेलियातील सीबी तिरंगी मालिकाही भारताने जिंकली होती. रॉबिन सिंग यांनी मुंबई इंडियन्सचे साहाय्यक प्रशिक्षक म्हणून 2007 ते 2009 या कालावधीत काम पाहिले आहे. माईक हेसन हे न्यूझीलंडचे माजी (2012-2018) प्रशिक्षक असून या मोसमात त्यांनी किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षकपद भूषविले आहे. विंडीजचे माजी सलामीवीर फिल सिमॉन्स यांनी इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेवेळी अफगाणिस्तानचे प्रशिक्षकपद भूषविले होते. मुडी व हेसन यांना उपखंडातील संघांत जास्त मागणी असल्याचे दिसून आले आहे.

Related posts: